Western Railway Bharti 2023 : तुम्हीही रेल्वेत जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. पश्चिमी रेलवे मार्फत मुंबईत भरती होणार असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदांवर होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे. अर्ज प्रक्रिया 27 जुन 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 3624 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरण्या जाणाऱ्या पदांचा तपशील?
फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, सुतार, चित्रकार (सामान्य), मेकॅनिक (DSL), मेकॅनिक (मोटार वाहन), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)
भरतीसाठी आवश्यक पात्रता:
i) मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10वी किंवा 10+2 उत्तीर्ण.
ii) NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र संबंधित ट्रेडमध्ये अनिवार्य आहे:
निवड प्रक्रिया अशी आहे:
गुणवत्ता यादी (मॅट्रिक्युलेशन [किमान 50% (एकूण) गुणांसह] आणि आयटीआय परीक्षा या दोन्हींना समान महत्त्व देऊन अर्जदारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाईल). कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज फी (नॉन-रिफंडेबल) – रु. 100/-.
SC/ST/PWD/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
वयोमर्यादा :
अर्जदारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 26/07/2023 रोजी वयाची 24 वर्षे पूर्ण झालेली नसावी.
SC/ST/OBC- उच्च वयोमर्यादा SC/ST अर्जदारांच्या बाबतीत 05 वर्षे आणि OBC अर्जदारांच्या बाबतीत 03 वर्षे शिथिल आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2023
वेबसाईट : www.rrc-wr.com