PCMC Recruitment 2023 दहावी उत्तीर्ण महिलांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतअंतर्गत आशा स्वयंसेविका पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन यापद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 154 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर पाठवावा.
पदाचे नाव : आशा स्वयंसेविका / Asha Swayam Sevika
काय आहे पात्रता :
यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच उमेदवार जाहिरातीमध्ये नमूद स्थानिक वस्तीमधील रहिवासी हवा.
वयोमर्यादा : 25ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया :
यासाठी निवड सरळ मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेला वेळेत हजार राहावे.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
असा अर्ज करा
महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, भोसरी, नेहरूनगर, सांगवी, तालेरा, जिजामाता,नवीन थेरगाव, आदी विविध रुग्णालयात 25 एप्रिल 2023 ते 4 मे 2023 पर्यंत सकाळी 09.00 ते दुपारी12.00 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तरी उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचे आहेत. पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्या. रुग्णालयनिहाय अर्ज स्वीकृतीची मुदत वेगवेगळी आहे. अधिक माहिती साठी दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ही कागदपत्रे जोडावी?
खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात.
-स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो.
-तसेच जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला अथवाशाळा सोडल्याचा दाखला)
-रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा.
-पॅन कार्ड
-लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
-नावात बदल असल्यास गॅझेट (राजपञ)
-अनुभव प्रमाणपत्र
-विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत जोडावी.
