Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2023 महिला व बाल विकास विभागामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी 10वी पास उमेदवारांना संधी आहे. याकरिता पात्र उमदेवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यामुळे पात्र उमेदवारांना 09 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
या भरतीअंतर्गत एकूण 14 पदे भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
1) शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक 04
2) मदतनीस तथा पहारेकरी 02
3) स्वच्छता कर्मचारी 04
4) समुपदेशक 01
5) स्वयंपाकी 02
6) काळजी वाहक 01
काय आहे पात्रता?
शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक – 10वी पास, पदवीधर, B.P.Ed पदवी.
मदतनीस तथा पहारेकरी – 10वी पास
स्वच्छता कर्मचारी – 10वी पास
समुपदेशक- Graduate in Social Work/ Sociology/ Psychology/ Public health/Counselling from a recognized university 18 ते 38 वर्ष
स्वयंपाकी- 10वी पास
काळजी वाहक- 10वी पास
वेतनमान (Pay Scale) : 7944/- रुपये ते 23,170/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक, मनमाड, मालेगाव (महाराष्ट्र)
अर्ज कसा करावा?
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सदरची पदे 11 महिन्यांकरीता कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ”जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक – 422011.” या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मे 2023 आहे.