12वी पाससाठी संधी..! बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव येथे 38 जागांवर भरती

Jalgaon Anganwadi Bharti  बाल विकास प्रकल्प अधिकारी जळगाव येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 38 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात कळजीपूर्वक वाचावी

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
आवश्यक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

नोकरी ठिकाण – जळगाव दक्षिण
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5,500/- पगार मिळेल
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ३५ वर्षे विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव दक्षिण प्रशासकीय इमारत टप्पा क्रं.3, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in
जाहिरात पहा : PDF