AIASL Recruitment 2023 दहावी ते पदवी उत्तीर्णांना विना परीक्षा नोकरी मिळविण्याची संधी चालून आलीय. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लि. (Air India Air Services Limited) मध्ये विविध पदांची मोठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक 17, 18, 19 व 20 एप्रिल 2023 आहे. AIASL Bharti 2023
या भरतीअंतर्गत एकूण 495 पदे भरली जणार आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार
1) ग्राहक सेवा कार्यकारी – 80 पदे
2) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 64 पदे
3) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 121 पदे
4) हँडीमन – 230 पदे
आवश्यक पात्रता काय?
ग्राहक सेवा कार्यकारी – या पदासाठी उमेदवार हा पदवीधर असावा.
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – या पदासाठी उमेदवार 12वी परीक्षा उत्तीर्ण असावा
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर –01) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर)+01 वर्ष अनुभव 02) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
हँडीमन – या पदासाठी उमेदवार हा 10वी परीक्षा उत्तीर्ण तसेच अवजड वाहन चालक परवाना (HMV) त्याच्याकडे असावा
अर्ज फी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नॉन-रिफंडेबल अर्ज फी भरावी लागेल. 500/- डिमांड ड्राफ्टद्वारे “एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड” च्या नावे मुंबई येथे देय.
माजी सैनिक/एससी/एसटी समुदायातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
वय श्रेणी
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे
ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 31 वर्षे आहे
SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा 33 वर्षे आहे
वेतन :
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 25,980/-
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 23,640/-
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 23,640 ते 25,980/-
हँडीमन – 21,330/
नोकरी ठिकाण : चेन्नई
मुलाखतीचे ठिकाण : Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai -600043.
थेट मुलाखत: 17, 18, 19 & 20 एप्रिल 2023 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
वेबसाईट : aiasl.in
जाहिरात पहा : PDF