केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) 113 रिक्त जागांवर भरती

UPSC Bharti 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार UPSC च्या www.upsconline.nic.in. या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 जून 2023 आहे

या भरती अंतर्गत एकूण 113 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) स्पेशल ग्रेड III 41
2) असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर 02
3) सिनियर असिस्टंट कंट्रोलर 02
4) असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर 68

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
स्पेशल ग्रेड III : (i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव.
असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर : भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
सिनियर असिस्टंट कंट्रोलर : (i) B.E/B.Tech (माइनिंग) (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर : संबंधित पदव्युत्तर पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
वयोमर्यादा :
या भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 जून 2023 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गातील उमेदवारांना 25/-परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/PH/महिला यांना फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जून 2023 (11:59 PM)
वेबसाईट : www.upsconline.nic.in.

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here