राज्यातील तरुणांसाठी खुशखबर आहे. राज्यातील तलाठी पदाच्या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 4644 जागा भरल्या जातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. अर्ज प्रक्रिया 26 जून 2023 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 (11:55 PM) आहे Talathi Recruitment 2023
पदाचे नाव : तलाठी
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावं [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क : या भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000/- शुल्क भरावे लागेल तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹900/- भरावे लागतील.
वेतनमान : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25500-81100 पगार मिळेल, तसेच इतर भत्ते
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
वेबसाईट : https://mahabhumi.gov.in