10वी पाससाठी खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 1558 जागांसाठी भरती

SSC MTS Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशनने मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) कर्मचारी आणि हवालदार (CBIC आणि CBN) भर्ती अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास उमेदवारांना नोकरीची मिळविण्याची खूप मोठी संधी आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते SSC च्या www.ssc.nic.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 1558 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 1198
2) हवालदार (CBIC & CBN) 360

भरतीसाठी पात्रता काय?
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)
: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
हवालदार (CBIC & CBN) : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

वयोमर्यादा (1 ऑगस्ट 2023)
किमान- 18 वर्षे
कमाल – 25 वर्षे
वयात सूट :
SC/ST-5 वर्षे
ओबीसी – 3 वर्षे
अनारक्षित PWBD-10 वर्षे
OBC PWBD-13 वर्षे
SC/ST PWBD-15 वर्षे

अर्ज फी :
महिला, SC/ST आणि दिव्यांगांसाठी अर्ज विनामूल्य आहे. इतरांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.

निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मानक चाचणी (PST) (केवळ हवालदार पदासाठी)

इतका पगार मिळेल?
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार यांचे मूळ वेतन रु. 18000/- आणि ग्रेड पे रु. 1800/-. 7व्या वेतन आयोगानुसार, SSC MTS आणि हवालदारांसाठी इन-हँड पगार रु.च्या वेतन बँडसह 18,000/ ते 22,000/ दरमहा आहे. ५२०० – रु. 20200 जॉब पोस्ट आणि वाटप केलेले शहर यावर अवलंबून.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:00 PM)

परीक्षा:
Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

वेबसाईट : www.ssc.nic.in
जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here