12वी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची संधी..! लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटरसह विविध पदाच्या 1600 जागांसाठी भरती

SSC CHSL Recruitment 2023 तुम्ही जर 12वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) SSC CHSL 2023 ची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मे 2023 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत 1600 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

RBI मध्ये ग्रेड बी पदांच्या बंपर भरतीची अधिसूचना जारी

कोणती पदे भरली जाणार?
या भरती अंतर्गत 1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), 2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) आणि 3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ ही पदे भरली जाणार आहे.

काय आहे पात्रता?
अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा.

कधी होणार परीक्षा?
एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा, 2023 टियर I जुलै किंवा ऑगस्टमध्ये आयोजित केली जाईल. परीक्षेची नेमकी तारीख लवकरच अधिकृत SSC वेबसाइटवर जाहीर केली जाईल. ही संगणक आधारित परीक्षा (CBE) असेल, असे अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाले तर सर्वसाधारण श्रेणीसाठी अर्जाचे शुल्क १०० रुपये असेल. तथापि, आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) यांना अर्ज शुल्कातून सूट दिली जाईल.
वयोमर्यादा : वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज कसा कराल?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट दिली पाहिजे.
होम पेजवर उपलब्ध असलेल्या ‘आता अर्ज करा’ लिंकवर क्लिक करा आणि नंतर ‘CHSL’ लिंकवर क्लिक करा.
सर्व तपशील भरा, आणि अर्ज फी भरा.
तपशील भरल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

वेतनश्रेणी ;
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

वेबसाईट : ssc.nic.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here