SSB : सशस्त्र सीमा बलात 10वी+ITI उत्तीर्णांसाठी 914 जागांवर भरती, पगार 81000 पर्यंत

Sashastra Seema Bal Recruitment 2023 सशस्त्र सीमा बलात (Sashastra Seema Bal) विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज प्रक्रिया अद्यापही सुरु झालेली नसून अर्ज करण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

या भरती अंतर्गत एकूण 914 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

कोणती पदे भरली जाणार?
1) हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
2) हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
5) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578

काय आहे आवश्यक पात्रता?
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) : 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) : 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
3) हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
4) हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) -(i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) : 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500/- ते 81,100/- रुपये पर्यंत पगार मिळेल. सोबतच डीए, रेशन मनी भत्ता, घरभाडे भत्ता आणि सरकारी नियमांनुसार इतर भत्ते

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : लवकरच

वेबसाईट : www.ssbrectt.gov.in
जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here