RBI Bharti 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये विविध पदांवर नवीन भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानुसार पात्र उमेदवार RBI च्या www.rbi.org.in वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 29
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत)-06
भरतीची आवश्यक पात्रता?
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 65% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 55% गुणांसह (45% for SC/ST/PwBD). 02) 02 वर्षे अनुभव.
कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थाकडून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 65% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 55% गुणांसह (45% for SC/ST/PwBD). 02) 02 वर्षे अनुभव.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2023 रोजी 20 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट दिली जाईल. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 450/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. [SC/ST/PwBD/EXS – 50/- रुपये]
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना ₹20700 – 1200 (3) – 24300 –1440 (4) – 300 या स्केलमध्ये ₹33,900/- प्रति महिना प्रारंभिक मूळ वेतन (म्हणजे ₹20,700/- अधिक कनिष्ठ अभियंत्यांना स्वीकार्य नऊ आगाऊ वेतनवाढ) काढतील. – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 आणि इतर भत्ते. सध्या, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) साठी प्रारंभिक मासिक एकूण वेतन अंदाजे ₹71,032/ आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023
वेबसाईट : www.rbi.org.in