Rajgurunagar Sahakari Bank Bharti 2023 राजगुरुनगर सहकारी बँक लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.
या भारतीय अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) मुख्य अनुपालन अधिकारी – 01
2) डेटा सेंटर प्रशासक -02
3) बोर्ड सचिव -01
भरतीसाठी आवश्यक पात्रता:
मुख्य अनुपालन अधिकारी :- उमेदवार हा सनदी लेखापाल (CA/CS) किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधारक व सहकारी बँकेतील 12 वर्षांपैकी किमान 05 वर्षाचा अनुभव, सरव्यवस्थापक/ उपसरव्यवस्थापक/सहाय्यक सरव्यवस्थापक या पदावर काम केलेचा तसेच लेखापरिक्षण, वित्त आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित असावा. त्यात रिझर्व बँकेच्या दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजीचे परिपत्रकातील निकषांची पूर्तता करणाऱ्या बँकिंग उद्योगातील, मुख्य कार्यालयातील नियामक आणि सर्वोच्च प्राधिकरणांना स्वतंत्र अनुपालन कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
डेटा सेंटर प्रशासक :- संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमसीए या संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर / पदव्युत्तर पदवी, मायक्रोसॉफ्ट किंवा ओरॅकलकडून प्रमाणपत्र किंवा ओरॅकल/एसक्यूएल डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, हार्डवेअर / नेटवर्किंग आणि सिस्टम इन्स्टॉलेशनमध्ये 07 वर्षांचा अनुभव असलेले 7 चे मॉनिटरिंग बँकेच्या आयटी विभागात 03 वर्षांचा कामाचा अनुभव.
बोर्ड सचिव :-पदवीधर / पदव्युत्तर पदवी, मराठी व इंग्रजी – लघुलेखन (किमान प्रति मिनिट 80 शब्द), टंकलेखन (किमान प्रति मिनिट 40 शब्द), MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील सदर / तत्सम पदावरील किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवांना परीक्षा फी नाही.
वेतन : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : राजगुरुनगर, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, 319/320 पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, जि. पुणे – 410 505.