रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर पूर्व रेल्वेत मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ner.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे. North Eastern Railway Recruitment 2023
या भरती अंतर्गत एकूण 1104 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. North Eastern Railway Bharti 2023
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)” या पदासाठी होणार आहे.
यांत्रिक कार्यशाळा/ गोरखपूर -411
सिग्नल वर्कशॉप/ गोरखपूर कॅंट -63
ब्रिज वर्कशॉप/गोरखपूर कॅंट -35
यांत्रिक कार्यशाळा/ इज्जतनगर -151
डिझेल शेड/इज्जतनगर -60
कॅरेज आणि वॅगन /लज्जतनगर 64
कॅरेज आणि वॅगन / लखनौ Jn -155
डिझेल शेड / गोंडा -90
कॅरेज आणि वॅगन /वाराणसी -75
नोकरी ठिकाण: गोरखपूर
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावा. सोबतच ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेकॅनिस्ट/टर्नर) केलेला असावा.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे असावे. सोबतच SC/ST प्रवर्गातील उमेदवाराला 05 वर्षे सूट दिली जाईल. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क :
जनरल/ओबीसी/ प्रवर्गातील उमेदवारांना 100/-रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/EWS/महिला कोणतेही शुल्क नाही
पगार : नियमानुसार
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2023 (05:00 PM)
वेबसाईट : ner.indianrailways.gov.in