रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक मोठी संधी चालून आलीय. रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण संस्था मार्फत नवीन मेगा भरती निघाली आहे. दहावी आणि बारावी पास उमेदवारांना ही मोठी संधी आहे. या भरतीमार्फत विविध पदे भरली जाणार असून त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल. 25 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या भरती अंतर्गत एकूण 3190 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
1) ज्युनियर टाइम कीपर – 1676 पदे
2) कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
3) कल्याण अधिकारी – 606 पदे
काय आहे पात्रता?
ज्युनियर टाईम कीपर – किमान 10वी पास आवश्यक आहे. (रेल्वे नोकऱ्या 2023)
कनिष्ठ सहाय्यक किमान – 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कल्याण अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे
अर्ज कसा करावा – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३
अर्ज शुल्क –
PwBD/ महिला/ ट्रान्सजेंडर/ माजी सैनिक उमेदवार आणि SC/ ST/ अल्पसंख्याक समुदाय/
मागासवर्गीय उमेदवार – रु. ५००/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. ७५०/-
पगार किती –
कनिष्ठ टाइमकीपर – रु.28,000/- प्रति महिना
कनिष्ठ सहाय्यक – रु.34,000/- प्रति महिना
कल्याण अधिकारी – रु.40,000/- प्रति महिना
निवड प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी CBT
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
वेबसाईट : rmgs.org
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here