बँकेत नोकरी संधी..! पंजाब & सिंध बँकेत विविध पदांवर बंपर भरती जाहीर

सरकारी बँकेत नोकरी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या पंजाब आणि सिंध बँकेने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी केल्यानंतर 28 जून 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. Punjab and Sind Bank Recruitment 2023

12 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट punjabandsindbank.co.in वर जाणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. Punjab and Sind Bank Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 183 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता?
1) IT ऑफिसर JMGS-I 24
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 01 वर्ष अनुभव
2) राजभाषा ऑफिसर JMGS-I 02
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव
3) सॉफ्टवेअर डेवलपर JMGS-I 20
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 01 वर्ष अनुभव
4) लॉ मॅनेजर MMGS-II 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 02/05 वर्षे अनुभव
5) चार्टर्ड अकाउंटेंट MMGS-II 30
शैक्षणिक पात्रता :
(i) CA (ii) 02 वर्षे अनुभव
6) IT मॅनेजर MMGS-II 40
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्पुटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 04 वर्षे अनुभव
7) सिक्योरिटी ऑफिसर MMGS-II 11
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) नौदल/सैन्य/हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा.
8) राजभाषा ऑफिसर MMGS-II 05
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
9) डिजिटल मॅनेजर MMGS-II 02
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B/Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE/ETC/इलेक्ट्रॉनिक्स)/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव
10) फॉरेक्स ऑफिसर MMGS-II 06
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन मध्ये प्रमाणित (iii) 02 वर्षे अनुभव
11) मार्केटिंग ऑफ रिलेशनशिप मॅनेजर MMGS-II 17
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MBA (मार्केटिंग)/PGDBA (ii) 04 वर्षे अनुभव
12) टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल) MMGS-III 01
शैक्षणिक पात्रता
: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
13) चार्टर्ड अकाउंटेंट MMGS-III 03
शैक्षणिक पात्रता :
(i) CA (ii) 04 वर्षे अनुभव
14) डिजिटल मॅनेजर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B/Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE/ETC/इलेक्ट्रॉनिक्स)/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 04 वर्षे अनुभव
15) रिस्क मॅनेजर MMGS-III 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह B.Sc (Statistics) किंवा MBA (फायनान्स) किंवा CA/ICWA/CS किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव
16) फॉरेक्स डीलर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/ICWA/CFA किंवा पदवीधर + MBA/PGDM (फायनान्स) (ii) 03 वर्षे अनुभव
17) ट्रेझरी डीलर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/ICWA/CFA किंवा 55% गुणांसह पदवीधर + MBA/PGDM (फायनान्स) (ii) 05 वर्षे अनुभव
18) लॉ मॅनेजर MMGS-III 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
19) फॉरेक्स ऑफिसर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन मध्ये प्रमाणित (iii) 03 वर्षे अनुभव
20) इकोनॉमिस्ट ऑफिसर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रिक्स / व्यवसाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

अर्ज शुल्क :
अर्जादरम्यान उमेदवारांना 1003 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. तथापि, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क फक्त 177 रुपये आहे.
पगार : 36000/- ते 78230/-

वयोमर्यादा :
31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल, अधिक तपशिलांसाठी आणि इतर तपशिलांसाठी भरती अधिसूचना पहा.

अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून, उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील.

वेबसाईट – punjabandsindbank.co.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here