PGCIL Recruitment 2023 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (PGCIL) ने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी 01 जुलै 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत www.powergridindia.com वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 1045 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा तपशील :
1) ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) 161
2) सेक्रेटरिअल असिस्टंट 03
3) डिप्लोमा अप्रेंटिस 335
4) पदवीधर अप्रेंटिस 409
5) HR एक्झिक्युटिव 94
6) CSR एक्झिक्युटिव 16
7) एक्झिक्युटिव (लॉ) 07
8) PR असिस्टंट 10
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
ITI अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) – ITI (इलेक्ट्रिकल)
सेक्रेटरिअल असिस्टंट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान.
डिप्लोमा अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पदवीधर अप्रेंटिस – B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) [सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स /IT].
HR एक्झिक्युटिव – MBA (HR) / MSW / पर्सोनेल मॅनेजमेंट / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा.
CSR एक्झिक्युटिव – MSW/ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी.
एक्झिक्युटिव (लॉ) – (i) पदवीधर (ii) LLB
PR असिस्टंट -मास कम्युनिकेशन (BMC)/ जर्नालिझम & मास कम्युनिकेशन (BJMC) पदवी / B.A. (जर्नालिझम & मास कम्युनिकेशन)
वयाची अट :
उमेदवाराची किमान वयोमर्यादा १८ वर्षे ठेवण्यात आली आहे. तर कमाल वयोमर्यादेबाबत माहितीसाठी, विभागाने जारी केलेली अधिसूचना पाहता येईल.
अर्ज फी :
सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. म्हणजेच, अर्ज विनामूल्य आहे.
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३
अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी, प्रथम पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://careers.powergrid.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदे निवडा आणि फॉर्म भरा आणि सबमिट करा.