चांदा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 250 पदांवर भरती सुरु

Ordnance Factory Chanda Recruitment 2023 चांदा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 250 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
उदा. AOCP ट्रेडचे प्रशिक्षणार्थी जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आणि आता मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत, ज्यांच्याकडे स्फोटके निर्मिती आणि लष्करी हाताळणीचे प्रशिक्षण/अनुभव आहे आणि NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र आहे.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असावं. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

नोकरी ठिकाण – चंद्रपूर
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी चंदा जिला: चंद्रपुर महाराष्ट्र, पिन -442501

वेबसाईट : www.ddpdoo.gov.in
जाहिरात पहा : PDF