खुशखबर! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया (NLC) मध्ये बंपर रिक्त जागा

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडने विविध पदे भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट nlcindia.in वर या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत बंपर रिक्त जागा भरल्या आहेत. जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही येथे अर्ज करू शकता.अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 5 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे. NLC Recruitment 2023

या भरती अंतर्गत एकूण 293 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. NLC Bharti 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) 223
2) डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) 32
3) मॅनेजर (E4 Grade) 16
4) असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) 06
5) ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) 08
6) जनरल मॅनेजर (E8 Grade) 02
7) डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) 06

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) : (i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) : (i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग पदवी/CA (ii) 19 वर्षे अनुभव
मॅनेजर (E4 Grade) : (i) M.Tech./M.Sc. (जिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर : (i) M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री) (ii) 04 वर्षे अनुभव
ॲडिशनल चीफ मॅनेजर : (i) CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA (ii) 13 वर्षे अनुभव
जनरल मॅनेजर : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी किंवा CA/ICWA. (ii) 22 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि (ii) कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / औद्योगिक संबंध / एचआरएम / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास. (ii) 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2023 रोजी 32 ते 54 वर्षांपर्यंत असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 854/- रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना ₹354/-रुपये शुल्क भरावे लागेल.

इतका पगार मिळेल :
या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना 50,000 रुपये ते 28,0000 रुपये मासिक वेतन (ग्रेड) दिले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2023 (11:45 PM)
वेबसाईट : www.nlcindia.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here