NIRDPR Bharti 2023 : राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थामार्फत होणाऱ्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना career.nirdpr.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 08 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 141 जागा भरल्या जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”यंग फेलो” या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता:
(i) सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा.
(ii) MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादा 01 एप्रिल 2023 रोजी मोजली जाईल. तर आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार कमाल वयात सवलत दिली जाईल.
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
अर्ज करणार्या जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ₹ 300 ची अर्ज फी भरावी लागेल. SC/ST/ESM/महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
वेतनश्रेणी : दरमहा 35,000 रुपये/-
निवड प्रक्रिया :
लेखी चाचणी/मुलाखतीमधील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल, एनआयआरडीपीआर रिक्त पद निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहितीसाठी, कृपया खालील अधिकृत पीडीएफ अधिसूचना तपासा.
अर्ज कसा करावा :
सर्वप्रथम तुम्हाला NIRDPR ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
त्यानंतर नोकरीच्या रिक्त पदांच्या विभागात जावे लागेल.
आता उमेदवाराने NIRDPR यंग फेलो रिक्रुटमेंट 2023 साठी APPLY ONLINE च्या बटणावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही यंग फेलोच्या समोरील Register & Apply बटणावर क्लिक करा.
आता दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.
आता अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा आणि रजिस्टर बटणावर क्लिक करा.
एसबी कलेक्टद्वारे अर्ज फी भरा.
शेवटी फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा आणि तुमच्याकडे ठेवा.