MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांसाठी नवीन भरती सुरु

MPSC Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 82 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

कोणती पदे भरली जाणार?
1) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ 01
2) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 41
3) समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 22
4) गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील 18

काय आहे आवश्यक पात्रता?
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ : (i) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) 10 वर्षे अनुभव.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग -: (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.

समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग: समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.

गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील: (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) शिक्षण पदवी (iii) 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 19 ते 45 वर्षे पर्यंत असावे. [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
पद क्र.1 & 4: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
पद क्र.2 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2023 (11:59 PM)

वेबसाईट : mpsc.gov.in
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

जाहिरात पहा :

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा
  4. पद क्र.4: पाहा