महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 114 जागांसाठी भरती

MPSC Civil Judge Bharti 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२” पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी MPSC च्या mpsc.gov.in संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 24 मे असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 जुन 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 114 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) नवीन विधी पदवीधर
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
3) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)

काय आहे शैक्षणिक पात्रता?
नवीन विधी पदवीधर –
55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता- (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
सेवा कर्मचारी- (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 मे 2023 रोजी 21 ते 45 वर्षे असावं. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अमागास श्रेणीतील उमेदवारांना 394/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 294/- रुपये शुल्क भरावे लागेल

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (11:59 PM)
परीक्षा: 09 सप्टेंबर 2023
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई & नागपूर.
वेबसाईट : mpsc.gov.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here