महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात नवीन बंपर भरती जाहीर

MPCB Recruitment 2023 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये (Maharashtra Pollution Control Board) विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार mpcb.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 58 जागा भरल्या जाणारी आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 29
2) सिनियर रिसर्च फेलो (SRF) 17
3) रिसर्च असोसिएट (RA) 10

भरतीसाठी पात्रता काय?
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) : केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी
सिनियर रिसर्च फेलो (SRF) : (i) केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे रिसर्च
रिसर्च असोसिएट (RA) : (i) Ph.D. ( केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण) (ii) 03 वर्षे रिसर्च
सूचना: UGC/CSIR, NET किंवा GATE किंवा GRE मध्ये पात्र नसलेले उमेदवार पात्र नाहीत आणि त्यांचा विचार केला जाणार नाही.

सूचना: UGC/CSIR, NET किंवा GATE किंवा GRE मध्ये पात्र नसलेले उमेदवार पात्र नाहीत आणि त्यांचा विचार केला जाणार नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 जुलै 2023 रोजी 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

इतका पगार मिळेल?
ज्युनियर रिसर्च फेलो- 31000/-
सिनियर रिसर्च फेलो – 35000/-
रिसर्च असोसिएट – 47000/- ते 54000/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (05:00 PM)
वेबसाईट : mpcb.gov.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click here