मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात भरती.. 2.18 लाखांपर्यंतचा पगार मिळेल

MMRDA Recruitment 2023 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवाराने ऑनलाईन /इमेलद्वारे अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज शेवटची तारीख 02 जून 2023 असणार आहे

या भरती अंतर्गत एकूण 3 जागा भरल्या जाणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
संचालक (वित्त), संचालक (देखभाल) आणि महाव्यवस्थापक (देखभाल) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

काय आहे पात्रता :
संचालक (वित्त)-:
सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया/ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया/ एमबीए (फायनान्स) चा सदस्य असावा.

संचालक (देखभाल)- अर्जदार हा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेचा अभियांत्रिकी पदवीधर असावा-मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक रेकॉर्डसह. इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (IRSEE) किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स (IRSME) किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनिअर्स (IRSSE) च्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

महाव्यवस्थापक (देखभाल)– अर्जदार हा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विषयातील अभियांत्रिकी पदवीधर असावा ज्यात मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून चांगल्या शैक्षणिक नोंदी असतील.
इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (IRSEE), इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनीअर (IRSSE) आणि इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर (IRSME) किंवा मेट्रो रेल्वेमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : 55 ते 57 वर्षे
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्या उमेदवारांना फी भरावी लागणार नाही.

कसा अर्ज करावा?
या भरतीसाठी उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल
तसेच अर्ज ई-मेलद्वारे देखील करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुन 2023 ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
अर्जाची प्रत पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
संचालक (वित्त) :
[email protected]
संचालक (देखभाल): [email protected]
महाव्यवस्थापक (देखभाल): [email protected]

तुम्हाला किती पगार मिळेल?
संचालक (वित्त) – 1,44,200 – 2,18,200/-
संचालक (देखभाल) – 1,44,200 – 2,18,200/-
महाव्यवस्थापक – 1,18,500 – 2,14,100/-

वेबसाईट : mmrda.maharashtra.gov.in
जाहिरात पहा : PDF