बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत नव्या भरतीची अधिसूचना जारी

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मार्फत नव्या भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. लक्ष्यात राहू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 28 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्व वाचून अर्ज करावा.

भरली जाणाऱ्या पदाचे नाव:
भौतिकोपचार तज्ञ – 08
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 10
औषधनिर्माता – 10

काय आहे पात्रता?
भौतिकोपचार तज्ञ : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा B.Sc. (PT) (बी. एस. सी. ( भौतिकोपचारतज्ञ)) / B. P. Th. ( बॅचलर ऑफ़ फ़ीजीओथेरेपी) पदवीधारक असावा 02) उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतीकोपचार परिषद, मुंबई येथे नोंदणीकृत असावा.

12वी पाससाठी मोठी संधी..! क्लीक करून जाणून घ्या..

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील (Degree in B. Sc.) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची (MSBT) ची / डी. एम. एल. टी. (D. M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc. + D.M.L.T.) किंवा 02) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. 03) उमेदवारास खात्यांतर्फे घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

औषधनिर्माता- : 01) उमेदवाराकडे राज्य शासनाच्या जनशिक्षण पडताळणी फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कैन्सिलकडे नोंदणीकृत असावा.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
तुम्हाला किती पगार मिळेल?
भौतिकोपचार तज्ञ – 25,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -20,000/-
औषधनिर्माता – 18,000/-

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी उमेदवारांना 344/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टि.म.स.रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात.

वेबसाईट : portal.mcgm.gov.in
जाहिरात पहा : PDF