Maharashtra Van Vibhag Recruitment 2023 महाराष्ट्र वन विभागामार्फत विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. तब्बल 2417 रिक्त पदांवर ही भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवार संबंधित www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 9 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 2417 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
वनरक्षक- 2138 पदे
लघुलेखक (उच्चश्रेणी) -13 पदे
लघुलेखक (निम्नश्रेणी)- 23 पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 08 पदे
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- 05 पदे
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- 15 पदे
सर्वेक्षक- 86 पदे
लेखापाल- 129 पदे
पदांनुसार आवश्यक पात्रता?
वनरक्षक- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
लघुलेखक (उच्चश्रेणी) : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट
इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी)- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट
इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी
किंवा
मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक– उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
सर्वेक्षक- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी. मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लेखापाल- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे. (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल त्यासाठी कृपया जाहिरात पाहावी)
अर्ज शुल्क : सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900/- इतके शुल्क लागेल.
शारीरक पात्रता :
पुरुष
उंची – 163 सेमी
छाती- 79 सेमी (84 सेमी फुगवून)
वजन- वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात
महिला
उंची – 150 सेमी
छाती- लागू नाही
वजन-वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात
अर्ज शुल्क : सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900/- इतके शुल्क लागेल.
शारीरक पात्रता :
पुरुष
उंची – 163 सेमी
छाती- 79 सेमी (84 सेमी फुगवून)
वजन- वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात
महिला
उंची – 150 सेमी
छाती- लागू नाही
वजन-वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | |
पदाचे नाव | जाहिरात पहा |
लेखापाल | Click here to Download |
वनरक्षक | Click here to Download |
सर्वेक्षक | Click here to Download |
लघुलेखक, सांख्यिकी सहाय्यक (कनिष्ठ व वरिष्ठ), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | Click here to Download |