ITBP Recruitment 2023 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ITBP च्या अधिकृत www.itbpolice.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 9 जून 2023 पासून सुरु होईन आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जुलै 2023 ही आहे.
या भरती अंतर्गत एकूण 81 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ)” या पदांसाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
01) मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02) मान्यताप्राप्त संस्थेतून सहाय्यक नर्सिंग मिडवाइफरी कोर्स उत्तीर्ण 03) केंद्र सरकार किंवा सरकारच्या नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत.
वयाची अट : 08 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही.
निवड प्रक्रिया:
शारीरिक कार्यक्षमता चाचणी
शारीरिक मानक चाचणी
लेखी चाचणी
प्रात्यक्षिक परीक्षा
DME/ RME
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500/- ते 81,100/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 08 जुलै 2023
वेबसाईट : : itbpolice.nic.in