10वी पाससाठी सुवर्णसंधी..! ITBP मार्फत 458 जागांवर निघाली भरती सुरु

ITBP Bharti 2023 : सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी ही भरती होणार आहे.

ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ITBP च्या अधिकृत वेबसाइट www.itbpolice.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २७ जूनपासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 जुलै 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

या भरती अंतर्गत एकूण 458 जागा भरल्या जातील. त्यामध्ये 195 पदे सामान्य श्रेणीसाठी, 110 पदे OBC, 42 पदे EWS, 74 पदे अनुसूचित जाती आणि 37 पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना सूचना नीट वाचण्याचा सल्ला दिला जातो. चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द मानला जाईल.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : कॉन्स्टेबल (चालक)
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
01) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
02) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
अर्ज करण्यासाठी किमान वय मर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. 26 जुलै 2023 वयाची गणना केली जाईल. मात्र, सरकारच्या नियमानुसार आरक्षित वर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याची तरतूद आहे.

अर्ज फी
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, सर्वसाधारण, OBC आणि EWS श्रेणींसाठी 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिकांच्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

वेतनश्रेणी : निवडलेल्या उमेदवारांना  21700- 69100/- (Level- 3) पगार मिळेल

अर्ज करण्याचे टप्पे
सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर होम पेजवरील रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
अर्ज फी भरा.
शेवटी, फॉर्मची एक प्रत मुद्रित करा.

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here