ISRO Bharti : इस्रोमध्ये पदवीधरांसाठी अनेक पदांवर भरती सुरु

ISRO Bharti 2023 : तुम्ही जर इस्रोमध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आलीय. भारत सरकारच्या अंतराळ विभागांतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार isro.gov.in आणि nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 एप्रिलपर्यंत आहे.

त्यानुसार पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीअंतर्गत एकूण 34 पदे भरण्यात येणार आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) ची 20 पदे
रिसर्च सायंटिस्ट (RS) ची 4 पदे
प्रोजेक्ट असोसिएट-I ची 7 पदे
प्रोजेक्ट सायंटिस्टची 3 पदे

पात्रता निकष :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून BE/B.Tech/B.Sc/M.Sc पदवी किंवा समकक्ष पात्रता असावी.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड CBT/मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

तुम्हाला किती पगार?
निवडलेल्या उमेदवारांना 31,000 रुपये ते 56,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

याप्रमाणे अर्ज करा
सर्वप्रथम www.nrsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
आता होमपेजवर करिअर टॅबवर क्लिक करा
‘विविध तात्पुरत्या संशोधन कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा’ वर क्लिक करा.
तुमची क्रेडेन्शियल्स वापरून नोंदणी करा.
लॉगिन करा आणि अर्ज भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 एप्रिल 2023
वेबसाईट : www.nrsc.gov.in
जाहिरात (Notification) सूचना : PDF

Online नोंदणीसाठी : Click Here

Leave a Comment