IRDAI मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

IRDAI Bharti 2023 जर तुम्हाला IRDAI मध्ये नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने विविध पदांसाठीची अधिसूचना जारी केली आहे.

त्यानुसार, IRDAI ने असिस्टंट मॅनेजरच्या एकूण 45 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आता इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची ही शेवटची तारीख ?
IRDAI मध्ये असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना 10 मे 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना तपासणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क :
अर्ज करणाऱ्या राखीव श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर, इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 750 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया :
निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहेत
पहिला टप्पा – ऑनलाइन प्राथमिक परीक्षा
दुसरा टप्पा – वर्णनात्मक परीक्षा
तिसरा टप्पा – मुलाखत

पगार :
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44,500/- रुपये मूळ वेतनस्केलमध्ये काढतील. 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850-3300(1)-89150 (17 वर्षे) आणि इतर भत्ते, जसे की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता.

असा करा अर्ज
सर्व प्रथम IBPS पोर्टल ibps.in वर जा.
मुख्यपृष्ठावर IRDAI भर्ती 2023 वर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
विहित शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

वेबसाईट : irdai.gov.in
जाहिरात (Notification) पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

Leave a Comment