IOCL Bharti 2023 इंडियन ऑइलमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने काही रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार IOCL च्या वेबसाईट iocrefrecruit.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 65 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
कोणती पदे भरली जाणार?
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) 54
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) 07
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) 04
काय आहे शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) – (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) – (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)+बॉयलर प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) – (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि त्यानंतर कौशल्य/प्रवीणता/शारीरिक चाचणीच्या आधारे निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत विषय ज्ञान (७५ गुण), संख्यात्मक क्षमता (१५ गुण) आणि सामान्य जागरूकता (१० गुण) या विषयांवर प्रश्न विचारले जातील. पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC/EWS:₹150/- [SC/ST/PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2023 (05:00 PM)
लेखी परीक्षा: 27 जून 2023
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता:
Gujarat Refinery: Dy. General Manager (HR), Indian Oil Corporation Limited, Gujarat Refinery, P.O. Jawahar Nagar, Dist. Vadodara – 391320(Gujarat)
Haldia Refinery: Deputy General Manager(HR), Indian Oil Corporation Limited, Haldia Refinery, PO: Haldia Oil Refinery, Dist: Purba Medinipur- 721606 (West Bengal)