Intelligence Bureau Bharti 2023 : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 जून 2023 पासून सुरू होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 797 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) या पदासाठी ही भरती होणार आहे.
जागा तपशील
अनारक्षित-325
EWS-79
OBC-215
SC-119
ST-59
काय आहे पात्रता:
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असावा तसेच विज्ञान मध्ये पदवी किंवा पदवीधर असावा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या UR, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना ₹ 500 ची अर्ज फी भरावी लागेल. तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना ₹450 ची अर्ज फी भरावी लागेल. अर्जाची फी ऑनलाइन किंवा चलन मोडद्वारे भरली जाऊ शकते.
किती पगार मिळेल? निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500 ते 81,100/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अशी होईल निवड?
ऑनलाइन लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
मुलाखत
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय तपासणी
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
वेबसाईट : www.mha.gov.in