नौदलात B.sc उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..! 372 जागांसाठी भरती

Indian Navy Chargeman Recruitment 2023 भारतीय नौदलात भरती होणार यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 मे 2023 पासून सुरू होईल. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 29 मे 2023 असणार आहे.

या भरती अंतर्गत एकूण 372 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ही भरती ”चार्जमन II” या पदासाठी होणार आहे.
पदांचा तपशील :
इलेक्ट्रिकल ग्रुप – 42 पदे
वेपन ग्रुप – 59 पदे
इंजिनिअरिंग ग्रुप – 141 पदे
कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप – 118 पदे
प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप – 12 पदे

शैक्षणिक पात्रता: B.Sc (PCM) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. अर्जदाराची वयोमर्यादा 29 मे 2023 पासून मोजली जाईल. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

10वी पास ते पदवीधरांसाठी सुरूय बंपर भरती ; त्वरित करा अर्ज

अशी होईल निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे होईल.
i) लेखी परीक्षा
ii) संगणक आधारित चाचणी
iii) व्यापार चाचणी / कौशल्य चाचणी
iv) मुलाखत
vi) वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी
vii) शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

अर्ज शुल्क :
अर्ज करणार्‍या जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ₹278 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. आणि SC/ST/PwD/ESM उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाची फी ऑनलाइन भरावी लागेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 
29 मे 2023

वेबसाईट : joinindiannavy.gov.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here