भारतीय नौदलात 1365 पदांवर आजपासून भरती सुरु ; पात्रता फक्त 12वी पास..

Indian Navy Agniveer Bharti 2023 भारतीय नौदलमध्ये अग्निवीर पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया 29 मे पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 1365 जागा भरल्या जाणार आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच
आवश्यक पात्रता : गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी परीक्षा उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

वयाची अट : जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.

शारीरिक पात्रता:
उंची :
पुरुष –
157 सेमी
महिला –152 सेमी

निवड प्रक्रिया :
12 व्या वर्गातील गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातील. यानंतर लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा होतील.

12वी गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
लेखी परीक्षा
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क :
सामान्य / OBC / EWS: 550/-
SC/ST: 550/-
परीक्षेचे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारेच भरा.
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30000 ते 40000 पर्यंत पगार मिळेल

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here