भारतीय टपाल विभागात 12,828 पदांवर भरती, 10वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स..

India Post GDS Bharti 2023 : भारतीय टपाल विभागाने विविध पदे भारण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवार भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023  16 ते 23 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 12,828 जागा भरल्या जाणार असून अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून अर्ज करावा. India Post GDS Recruitment 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. 11 जून 2023 रोजी वयाची गणना केली जाईल. तर आरक्षित वर्गांना शासकीय नियमानुसार कमाल वयात सवलत दिली जाईल. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणी, इतर मागासवर्गीय आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना ₹ 100 चे अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ST/PWD उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. अर्जाची फी ऑनलाइन भरावी लागेल.

उत्तीर्ण उमेदवारांना एवढा पगार मिळेल?
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)- 12,000-29,380 /-
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) -10,000-24,470 /-

निवड प्रक्रिया :
उमेदवाराची निवड खालील प्रक्रियेनंतर केली जाईल.
सर्वप्रथम उमेदवारांना 10वीच्या गुणांच्या आधारे निवडले जाईल.
त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल.

असा करा अर्ज:
सर्व प्रथम, उमेदवाराला इंडिया पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.
यशस्वी नोंदणीनंतर, लॉगिन बटणावर क्लिक करा.
आता तुम्हाला ग्रामीण डाक सेवक भर्ती 2023 च्या अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल.
अर्जाच्या लिंकवर क्लिक करताच, अर्ज उघडेल ज्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुमच्या श्रेणीनुसार अर्ज फी भरा.
शेवटी फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :
Click Here