IDBI बँकेत पदवीधरांना मोठी संधी.. 1036 पदांवर भरती सुरु

IDBI बँकमध्ये नोकरी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. IDBI मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना बँकेच्या www.idbibank.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जून 2023 पर्यंत आहे. IDBI Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 1036 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”अधिकारी” या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.
– संगणकाचे संचालन आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
सर्टिफिकेट/डिप्लोमा/कॉम्प्युटर ऑपरेशन्स/भाषा/ यातील पदवीने हायस्कूल/कॉलेज/संस्थेतील एक विषय म्हणून संगणक/माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे असावं. तसेच उमेदवाराचा जन्म 2 मे 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 मे 2003 नंतर झालेला नसावा, (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत आहे.)

अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल ओबीसी उमेदारांना 1000/-अर्ज शुल्क भराव लागेल. तसेच SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना रु.200/- रुपये अर्ज फी भरावी लागेल.

तुम्हाला किती पगार मिळेल?
पहिल्या वर्षी रु. 29,000/- दरमहा
द्वितीय वर्ष रु. 31,000/- दरमहा
तिसरे वर्ष रु. 34,000/- दरमहा

निवड प्रक्रिया :
ऑनलाइन चाचणी (OT)
दस्तऐवज पडताळणी (DV) आणि
भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी (PRMT)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
वेबसाईट : www.idbibank.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here