ICMR NIMR Bharti : 10वी, 12वी, पदवीधरांसाठी मोठी भरती, पगार 1,12,400 पर्यंत

ICMR NIMR Bharti 2023 मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्थेअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार nimr.org.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2023 आहे.

या भरतीद्वारे एकूण 79 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
तांत्रिक सहाय्यक:
26 पदे
तंत्रज्ञ-1: 49 पदे
प्रयोगशाळा परिचर: 4 पदे

भरतीसाठी आवश्यक पात्रता :
तांत्रिक सहाय्यक- : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
तंत्रज्ञ : विज्ञान विषयात 12वी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण
प्रयोगशाळा परिचर – : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वेतनमान :
तांत्रिक सहाय्यक – Level – 6 (Rs. 35,400-1,12,400/-)
तंत्रज्ञ – Level – 2 (Rs. 19,900-63,200/-)
प्रयोगशाळा परिचर – Level – 1 (Rs. 18,000-56,900/-)

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 जुलै 2023 रोजी, 25 ते 30 वर्षे असावी. तसेच SC/ST – 05 वर्षे सूट तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.

निवड प्रक्रिया
तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर या पदांसाठी निवड लेखी चाचणीद्वारे केली जाईल.

अर्ज कसा करावा
उमेदवारांनी अर्ज योग्यरित्या भरा आणि तो सीलबंद लिफाफ्यात पाठवावा, “या पदासाठी अर्ज (पदाचे नाव) लिफाफ्यावर खालील पत्त्यावर” लिहून पाठवावे लागेल
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ” संचालक, राष्ट्रीय मलेरिया आणि संशोधन संस्था, क्षेत्र- 8, द्वारिका, नवी दिल्ली- 110077.

वेबसाईट : www.nimr.org.in
जाहिरात पहा : PDF