IBPS Clerk Recruitment : सरकारी बँकांमध्ये ‘क्लार्क’ पदांची मेगाभरती सुरु

IBPS Clerk Recruitment 2023 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत नवीन मेगाभरती निघाली आहे. क्लार्क पदांसाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार www.ibps.in वेबसाईटवरून जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. करण्याची शेवटची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 4045+ जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : क्लार्क

भरतीसाठी पात्रता काय?
अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
उमेदवारांकडे नोंदणीच्या दिवशी ते पदवीधर असल्याचे वैध गुणपत्रिका/पदवी प्रमाणपत्र असावे आणि त्यांच्या पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शविली जावी.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02.07.1995 पूर्वी झालेला नसावा आणि 01.07.2003 च्या नंतर झालेला नसावा. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क :
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

निवड प्रक्रिया
भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होते:
प्राथमिक परीक्षा
मुख्य परीक्षा
बहुतेक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लिपिक संवर्गाच्या पदासाठी निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. येथे लक्षात घेण्यासारखी मुख्य गोष्ट म्हणजे मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही मुलाखत प्रक्रिया आवश्यक नाही. मुख्य परीक्षेच्या निकालाला 100% वेटेज दिले जाते.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023
पूर्व परीक्षेची तारीख – ऑगस्ट/सप्टेंबर 2023
मुख्य परीक्षेची तारीख- ऑक्टोबर, 2023
वेबसाईट : www.ibps.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here