HURL Bharti 2023 : हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच 12 मे 2023 पर्यंत आहे. ही भरती नॉन-एक्झिक्युटि पदांसाठी होणार आहे.
या भरती अंतर्गत एकूण 232 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
कोणती पदे भरली जाणार?
कनिष्ठ अभियंता सहाय्यक-08
अभियंता सहाय्यक (I)-43
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-01
अभियंता सहाय्यक (I)-30
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-01
अभियंता सहाय्यक (I) – 27
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-02
अभियंता सहाय्यक (I)-15
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-14
अभियंता सहाय्यक (I)-35
अभियंता सहाय्यक (I)-06
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (II)-01
अभियंता सहाय्यक (I)-18
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (II)-11
प्रयोगशाळा सहाय्यक (I)-15
गुणवत्ता सहाय्यक (I)-03
कनिष्ठ लेखा सहाय्यक (II)-01
स्टोअर असिस्टंट (I)-01
काय आहे पात्रता?
या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता पदानुसार आहे. काही B.Sc साठी, काही B.Com साठी आणि काही B.Tech साठी उमेदवार अर्ज करू शकतात. तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वयाची अट : उमेदवाराचे वय 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.सरकारी निकषांनुसार आरक्षित श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड आणि पगार
या पदांवरील निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. प्रथम संगणकावर आधारित चाचणी म्हणजेच CBT असेल. यानंतर ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट होईल. निवड झाल्यावर अनुभवानुसार वेतन मिळते. साधारणपणे, एका वर्षात 4 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. याशिवाय इतर भत्तेही मिळतील.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023