नोकरीची सर्वात मोठी संधी.. EPFO तर्फे 2859 जागांसाठी बंपर भरती

सरकारी नोकऱ्यांच्या तयारीत गुंतलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे EPFO ​​ने 2859 पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल किंवा तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे. EPFO Bharti 2023

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
सुरक्षा सहाय्यकाच्या – 2674 पदे आणि स्टेनोग्राफरच्या 185 पदांसाठी ही भरती होणार आहे.

आवश्यक पात्रता :
सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांसाठी, उमेदवारास इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गतीसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
स्टेनोग्राफर पदांसाठी, उमेदवार 80 शब्द प्रति मिनिट श्रुतलेखन आणि इतर टायपिंग क्षमतेसह 12 वी पास असावा.

वयोमर्यादा: अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे. तर कमाल 27 वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयात सूट देण्याची तरतूद आहे.

निवड प्रक्रिया :
संगणक आधारित लेखी चाचणी आणि संगणक टायपिंग चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. स्टेनोग्राफर पदांसाठी टायपिंग टेस्टऐवजी स्टेनो स्किल टेस्ट असेल.
परीक्षा शुल्क : 700 रुपये /-

किती पगार मिळेल तुम्हाला :
लेव्हल 5 अंतर्गत सामाजिक सुरक्षा सहाय्यकांसाठी 29200 ते 92,300 रुपये आणि लेव्हल 4 अंतर्गत स्टेनोग्राफरसाठी 25,500 ते 81,100 रुपये पगाराची तरतूद आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2023
वेबसाईट : www.epfindia.gov.in
Online नोंदणीसाठी : Click Here
जाहिरात (Notification) सूचना
:
सामाजिक सुरक्षा सहाय्यक – PDF
स्टेनोग्राफर– PDF

Leave a Comment