DTP Maharashtra Recruitment 2023 तुम्हीही जर राज्य शासनाच्या विभागात होणाऱ्या भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत ”रचना सहायक (गट-ब)” या पदांसाठीच्या भरतीकरीत अधिसूचना जारी झाली आहे.
त्यानुसार पात्र उमेदवाराने cdn3.digialm.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे. DTP Maharashtra Bharti 2023
एकूण किती जागा रिक्त आहेत?
या भरतीअंतर्गत एकूण 177 जागा रिक्त आहेत. त्यानुसार अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
रिक्त पदाचे नाव: रचना सहायक (गट-ब)
शैक्षणिक पात्रता: स्थापत्य/ग्रामीण/नागरी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
ही आहेत नोकरीचे ठिकाण :
या पदभारतीद्वारे पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती या सर्व विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
वयाची मर्यादा :अर्ज करणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क :
प्रवर्गवारीनुसार वेगवेगळी परीक्षा फी आकारली जाणार आहे. त्यानुसार अराखीव प्रवर्गसाठी रु. 1000/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार असून राखीव प्रवर्ग यांसाठी रु. 900/- इतका अर्ज शुल्क आकारला जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023
प्रवेशपत्र: 16 मे 2023 पासून
परीक्षा (Online): 29 मे 2023
वेबसाईट : www.dtp.maharashtra.gov.in
जाहिरात (Notification) सूचना : PDF
Online नोंदणीसाठी : Click Here