अणुऊर्जा विभागामार्फत मुंबईत मोठी भरती ; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी..

DPS DAE Bharti 2023 अणुऊर्जा विभागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयाने भरतीसाठीची अधिसूचना जारी केली आहे. निवडलेल्या उमेदवारांची मुंबई आणि देशभरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियुक्ती केली जाईल.

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना, dpsdae.formflix.in या अधिकृत वेबसाइटवर प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया 22 एप्रिलपासून सुरू होणार असून उमेदवार 15 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. या भरतीअंतर्गत एकूण 65 जागा भरल्या जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती होणार?
ज्युनियर पर्चेस असिस्टंट
ज्युनियर स्टोअर कीपर
शैक्षणिक पात्रता:
60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

click here new

12वी पाससाठी बंपर भरती

वयाची अट :
उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म 15 मे 1996 ते 15 मे 2005 दरम्यान झालेला असावा. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शिथिल केली जाईल.
अर्ज शुल्क :
अर्ज करताना 200 रुपये शुल्कही भरावे लागणार आहे. SC, ST, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवार तसेच सर्व महिला उमेदवारांना फी भरण्याची आवश्यकता नाही.

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2023
परीक्षा: जून 2023

click here new

वेबसाईट: dpsdae.formflix.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

Leave a Comment