डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 12 व 20 एप्रिल 2023 आहे. DBSKKV Recruitment 2023
या भरतीअंतर्गत एकूण 3 पदे भरली जाणार आहे. अर्ज कुठे कराल, किती पगार मिळेल? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
1) लिपिक/ टंकलेखक-01
2) प्रक्षेत्र सहाय्यक- 02
काय आहे शैक्षणिक पात्रता?
लिपिक/ टंकलेखक- 01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पदवी उत्तीर्ण. 02) शासकीय मान्यताप्राप्त टंकलेखन इंग्रजी 40 श. प्र. मि. आणि मराठी 30 श. प्र. मि. परीक्षा उत्तीर्ण. 03) एम. एस. सी. आय. टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. 04) लिपीक/टंकलेखक’ या पदावरील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
प्रक्षेत्र सहाय्यक- 01) उमेदवार हा कृषि पदविका किंवा कृषि पदवी (पशु विज्ञान शास्त्र / अन्नशास्त्र कृषि तंत्रज्ञान / कृषि अभि / मृद विज्ञान, मत्स्य विज्ञान / कृषि जैव तंत्रज्ञान कृषि व्यवस्थापन) धारक असावा. 02) MS-CIT संगणकीय हाताळणी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03) विद्यापीठ प्रक्षेत्रावरील व कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षपर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
किती पगार मिळेल?
i) लिपिक/ टंकलेखक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12000/- रुपये पगार मिळेल
ii) प्रक्षेत्र सहाय्यक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000/ रुपये पगार दिला जाईल.
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज कुठे कराल?
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ”मा. प्रमुख शास्त्रज्ञ, अ.भा.स.सिंचन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली, पिन कोड नं. – 415711, ता.दापोली, जि. रत्नागिरी” या पत्त्यावर पाठवावा.
वेबसाईट : dbskkv.org
जाहिरात (Notification) पहा :
लिपिक/ टंकलेखक – PDF
प्रक्षेत्र सहाय्यक- PDF