CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force) भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना एक मोठी संधी आहे. CRPF ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 212 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. CRPF Recruitment 2023
कोणती पदे भरली जाणार?
1) उपनिरीक्षक SI (RO)
2) उपनिरीक्षक SI (क्रिप्टो)
3) उपनिरीक्षक SI (तांत्रिक)
4) उपनिरीक्षक SI (सिव्हिल) (पुरुष)
5) सहायक उपनिरीक्षक ASI (तांत्रिक)
6) सहायक उपनिरीक्षक ASI (ड्राफ्ट्समन)
काय आहे आवश्यक पात्रता :
उपनिरीक्षक SI (RO)- गणित, भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान या विषयांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समतुल्य.
उपनिरीक्षक SI (क्रिप्टो) – गणित आणि भौतिकशास्त्र विषय म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – B.E./B.Tech किंवा मुख्य विषय म्हणून इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये समकक्ष किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सचे पात्र सहयोगी सदस्य.
उपनिरीक्षक SI (सिव्हिल) (पुरुष) – मान्यताप्राप्त बोर्ड/संस्था किंवा विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा समकक्ष सह इंटरमिजिएट.
सहायक उपनिरीक्षक ASI (तांत्रिक) – डिप्लोमा इन रेडिओ/ इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजी. किंवा B.Sc. भौतिकशास्त्र, रसायन, गणित सह
सहायक उपनिरीक्षक ASI (ड्राफ्ट्समन) – ड्राफ्ट्समन/सिव्हिल मेक मध्ये डिप्लोमा. इंजी.
वयोमर्यादा : 25 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
उपनिरीक्षक पदांसाठी : जनरल/ OBC/ EWS: रु. 200/-
सहायक उपनिरीक्षक पदांसाठी: जनरल/ OBC/ EWS : रु. 100/-
SC/ST/ESM/महिलांना शुल्क नाही
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
शारीरिक मानक चाचणी (PST)/ शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया : 1 मे 2023 पासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023
परीक्षेची तारीख : 24-25 जून 2023
तुम्हाला किती पगार मिळेल?
उपनिरीक्षक SI (RO) – 35400-112400
उपनिरीक्षक SI (क्रिप्टो) – 35400-112400
उपनिरीक्षक SI (तांत्रिक) – 35400-112400
उपनिरीक्षक SI (सिव्हिल) (पुरुष) – 35400-112400
सहायक उपनिरीक्षक ASI (तांत्रिक) 29200-92300
सहायक उपनिरीक्षक ASI (ड्राफ्ट्समन)-29200-92300