कोचीन शिपयार्डमध्ये 300 रिक्त जागा ; 10वी+ITI पाससाठी नोकरीची संधी..

Cochin Shipyard Bharti 2023 कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना www.cochinshipyard.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 जुलै 2023  आहे,

या भरती अंतर्गत एकूण 300 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव खालीलप्रमाणे :
1) फॅब्रिकेशन असिस्टंट
i) शीट मेटल वर्कर 21
ii) वेल्डर 34
2) ऑउटफिट असिस्टंट
i) फिटर 88
ii) मेकॅनिक डिझेल 19
iii) मेकॅनिक मोटार व्हेईकल 05
iv) प्लंबर 21
v) पेंटर 12
vi) इलेक्ट्रिशियन 42
vii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 18
viii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 34
ix) शिपराइट वुड 05

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
फॅब्रिकेशन असिस्टंट
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
ऑउटफिट असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण : कोची
वेतनश्रेणी :
1st year – प्रति महिना एकत्रित वेतन ₹ 23300/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी ₹ 4900/-)
2nd year ₹ – प्रति महिना एकत्रित वेतन 24000/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5000/-)
3rd year – प्रति महिना एकत्रित वेतन₹ 24800/- (कामाच्या अतिरिक्त तासांसाठी₹ 5100/-)

वयाची अट :
अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय 28 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 600/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2023
वेबसाईट : www.cochinshipyard.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here