CGST and Customs : 12वी ते पदवी उत्तीर्णांना पुण्यात केंद्रीय नोकरीची संधी.. नवीन भरती सुरु

पुण्यात केंद्रीय नोकरीच्या मिळविण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी आहे. केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने 25 मे 2023 पर्यंत अर्ज पाठवावा. CGST and Customs Pune Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 11 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

कोणत्या पदांसाठी होणार भरती
1) कर सहाय्यक – 02 पदे
2) स्टेनोग्राफर ग्रेड-II- 06 पदे
3) हवालदार – 03 पदे

शैक्षणिक पात्रता :
कर सहाय्यक :
मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा समकक्ष. कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. प्रति तास 8000 की डिप्रेशन्सपेक्षा असा डेटा एंट्रीचा वेग
स्टेनोग्राफर ग्रेड-II – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष. कौशल्य चाचणी नियम श्रुतलेखन 10 मिनिटे @ गती 80 शब्द प्रति मिनिट प्रतिलेखन 50 मिनिटे (इंग्रजी)
हवालदार : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांकडून कुठलीही परीक्षा फी आकारली जाणार नाहीय.

तुम्हाला किती पगार मिळेल?
कर सहाय्यक : रु.25,000 – 81,500/-
स्टेनोग्राफर ग्रेड-II : रु.25,000 – 81,500/-
हवालदार : रु.18,000 – 56,900/-

नोकरी ठिकाण – पुणे

कसा कराल अर्ज?
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने 25 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100

वेबसाईट : www.cbic.gov.in
जाहिरात पहा : PDF