CDAC Bharti 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार यासाठी पात्र उमेदवारांना CDAC च्या www.cdac.in या अधिकृत संकेतस्थवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 मे 2023 पर्यंत आहे.
या भरती अंतर्गत एकूण 63 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ही पदे भरली जाणार?
1) प्रोजेक्ट असोसिएट 35
2) प्रोजेक्ट इंजिनिअर 17
3) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 09
4) प्रोजेक्ट मॅनेजर 02
काय आहे पात्रता?
प्रोजेक्ट असोसिएट : (i) BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 01 ते 04 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट इंजिनिअर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 03 ते 04 वर्षे अनुभव
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 12 ते 15 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 मे 2023 रोजी 34 ते 50 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : कोणत्या श्रेणीतील उमेदवाराला भरतीसाठी अर्ज फी भरावी लागणार नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2023 (06:00 PM)
वेबसाईट : www.cdac.in