भारत पेट्रोलियम (BPCL) मार्फत मुंबईत मोठी भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल..

BPCL Recruitment 2023 भारत पेट्रोलियम लि (Bharat Petroleum Corporation Ltd) मुंबईत काही रिक्त पदांवर भरती होणार असून यासाठीची अधिसूचना संबधीत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार www.bharatpetroleum.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 138 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा

भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील:
पदवीधर अप्रेंटिस –
77 जागा
केमिकल/सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/फायर सेफ्टी

डिप्लोमा अप्रेंटिस/NEG – 61 जागा
केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
पदवीधर अप्रेंटिस:
60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: 50% गुण]
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Com/B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: 50% गुण]

नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क किती भरावी लागेल?
या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावी लागणार नाही.

इतका पगार मिळेल?
पदवीधर प्रशिक्षणार्थी (पदवी) – 18,000/- रुपये
तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी – 25,000/- रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
वेबसाईट : www.bharatpetroleum.com

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here