Bombay High Court Recruitment 2023 4थी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. मुंबई उच्च न्यायालयमध्ये होणाऱ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवाराने ऑफलाईन यापद्धतीने आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 02 मे 2023 पर्यंत पाठवावा.
या भरतीअंतर्गत एकूण 03 पदे रिक्त आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
‘कुक‘ या पदासाठी ही भरती होणार आहे.
काय आहे पात्रता?
उमेदवार हा 4थी पास असावा.
उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असण आवश्यक आहे.
मराठी व हिंदी भाषा लिहीता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थसुध्दा बनवता येणे आवश्यक आहे.
वयाची अट :
जाहिरात प्रसिध्दीच्या तारखेला १८ वर्षापेक्षा लहान व ३८ वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षाची असेल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही
किती पगार मिळेल?
वेतनश्रेणी सातव्या आयोगानुसार निवड झालेल्या उमेदवाराला 16,600 ते 52,400 रुपये पगार मिळेल, व इतर देय भत्तेही मिळतील.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 02 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९.

वेबसाईट : bombayhighcourt.nic.in
जाहिरात (Notification) पहा : PDF
Application Form: PDF