भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत 428 पदांसाठी भरती, दरमहा 55000 पगार मिळेल..

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या भरती पात्र आणि इच्छुक उमेदवार jobapply.in/bel2023maybng या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 428 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
प्रकल्प अभियंता पदाच्या 327 आणि प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या 101 जागा आहेत.

प्रकल्प अभियंता
प्रोजेक्ट इंजिनीअरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शाखेत 164, मेकॅनिकलमध्ये 106, कॉम्प्युटर सायन्समध्ये 47, इलेक्ट्रिकलमध्ये 07, केमिकलमध्ये 1, एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये 2 जागा रिक्त आहेत.
UR साठी 132, OBC साठी 88, EWS साठी 33, SC साठी 49, ST साठी 25 जागा आहेत.

प्रशिक्षणार्थी अभियंता :
प्रशिक्षणार्थी अभियंत्यासाठी इलेक्ट्रॉनिक्समध्ये 100 जागा, एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये 1 जागा रिक्त आहे. अनारक्षित 45, ओबीसीसाठी 13, EWS साठी 25, SC आणि ST साठी 9-9 जागा आहेत.

आवश्यक पात्रता आणि वयाची अट :
प्रकल्प अभियंता – किमान 55% गुणांसह संबंधित ट्रेडमधील B.Tech आणि दोन वर्षांचा अनुभव.
कमाल वयोमर्यादा – 32 वर्षे.
प्रशिक्षणार्थी अभियंता– किमान 55% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये B.Tech.
कमाल वयोमर्यादा – 28 वर्षे
ओबीसींना तीन वर्षे आणि एससी एसटीला वयात पाच वर्षांची सूट मिळेल.

किती पगार मिळेल तुम्हाला:
प्रकल्प अभियंता
पहिले वर्ष – रु 40,000/-
दुसरे वर्ष – रु 45,000/-
3रे वर्ष – रु.50,000/-
चौथे वर्ष – रु 55,000/-

प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी
पहिले वर्ष – रु.30,000/-
दुसरा – रु 35,000/-
3रे वर्ष – रु.40,000/-

निवड
लेखी परीक्षा आणि मुलाखत. लेखी परीक्षा 85 गुणांची असेल. मुलाखत 15 गुणांची असेल.

अर्ज शुल्क
प्रकल्प अभियंता – रु 400 + 18% GST
प्रशिक्षणार्थी अभियंता – रु. 150/- + 18% GST
एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

वेबसाईट : www.bel-india.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here