बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची संबंधित संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ibpsonline.ibps.in/bmcgomay23 या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 13 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 जुलै 2023 आहे. Bank of Maharashtra Recruitment 2023
या भरती अंतर्गत एकूण 400 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ऑफिसर स्केल III 100
2) ऑफिसर स्केल II 300
भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
ऑफिसर स्केल III –: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल II –: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वेतनश्रेणी :
ऑफिसर स्केल III :- 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230
ऑफिसर स्केल II :- 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी, 25 ते 38 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी जनरल/ओबीसी//EWS प्रवर्गातील उमेदवारांना 1180/- रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 118/- रुपये लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2023
वेबसाईट : bankofmaharashtra.in